बुलडाण्यात 16 वर्षीय अल्पवयीन मुलाची गळफास घेऊन आत्महत्या
बुलडाणा – 7 जून, मिरर न्युज नेटवर्क
बुलडाणा शहरातील महावीर नगर भागात राहणाऱ्या एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज 7 जूनला सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे.
आदित्य संजय गिरी असे मृतकाचे नाव आहे. आज दुपारी घरी कोणीच नसताना आदित्यने गळफास घेतली. हे बाब सायंकाळी घरच्यांच्या लक्षात येताच त्यांनी आदित्यला बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. आदित्यने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप कळू शकले नाही. तो नवव्या वर्गात शिकत होता.