अखेर त्या चावट “भूलतज्ञ” डॉक्टर विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल, जिल्हा स्त्री रुग्णालयात प्रशिक्षणार्थी डॉक्टर तरुणीची काढली होती छेड
बुलडाणा – 30 मे, मिरर नेटवर्क
बुलडाणा येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात ऑन कॉल ड्युटीवर कार्यरत भुलतज्ञ डॉक्टराने प्रशिक्षणासाठी आलेल्या एका डॉक्टर तरुणीची छेड काढल्याची धक्कादायक घटना 11 मेच्या रात्री 11:30 वाजेच्या दरम्यान घडली होती.या प्रकरणी डॉक्टर तरुणीच्या तक्रारीवर 29 मेच्या रात्री 10:30 वाजेच्या सुमारास त्या चावट डॉक्टर विरुद्ध विनयभंगाचा बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ग्रामीण भागात जाऊन 3 महिने प्रशिक्षण घ्यावे लागते.याकरिता बुलडाणा येथील स्त्री रुग्णालयात प्रशिक्षण घेण्यासाठी प्रशिक्षणार्थी डॉक्टर येत असतात व त्यामध्ये तरुणींचा देखील समावेश असतो. बुलडाणा येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात प्रशिक्षणासाठी आलेली एका तरुणी डॉक्टर सोबत 11 मेच्या रात्री धक्कादायक घटना घडली आहे. स्त्री रुग्णालयात एनआरएचएम अंतर्गत ऑन कॉल तत्त्वावर कार्यरत भुलतज्ञ डॉ.अविनाश सोळंके याने रात्री ड्युटीवर असलेल्या तरुणीला व्हाट्सएपवर मॅसेज करून रुग्णालय बाहेर बोलावले.तरुणी बाहेर आली असता तिला कार मध्ये बसण्याचे सांगितले परंतु फिर्यादीने काय काम आहे सर? असे विचारले असता आरोपी म्हणाला की तु मला आवडते,तुझ्या सोबत लग्न करायचे आहे,असे बोलून तिचा वाईट उद्देशाने हात धरला.फिर्यादीने आरोपी डॉ. सोळंकेच्या हाताला झटका देऊन लेबर रूम मध्ये गेली असता आरोपी तिच्या मागे जाऊन हजर स्टाफ समोर तिच्या अंगाला हात लावण्याचा प्रयत्न केला. अशा रिपोर्ट वरून आरोपी भूलतज्ञ डॉक्टर अविनाश सोळंके विरुद्ध बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.