“यांना” लाज कशी वाटत नाही;दिवसाढवळ्या बुलडाणा बसस्थानक परिसरात प्रेमीयुगलांचे अश्लील चाळे,व्हिडिओ होतोय व्हायरल
बुलडाणा – 22 मे
बुलडाणा शहर सुसंस्कृत शहर म्हणून ओळखले जाते. जिल्हा मुख्यालय असल्याने अधिकारी व कर्मचारी वर्ग मोठ्या प्रमाणात येथे वास्तव्यास आहे.शाळा,कॉलेज व कोचिंग क्लासेस असल्याने गाव खेड्यातील मुले – मुली देखील शहरात येतात. त्यामुळे येथील बसस्थानकात काही टवाळखोर संधी साधून मुलींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढतात.जणू बस स्टॅन्ड हे प्रेमीयुगलांच्या मिलनचा अड्डा बनलाय.
21 मेला सायंकाळी सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. यात बुलडाणा बस स्टँडवरील रिझर्वेशन कक्षाच्या बाहेर (जुनी पाणपोई जवळ) एक तरुण जोडपं खुलेआम “चुंबन” घेतांना दिसून येतय,प्यार किया तो डरना क्या! या फिल्मी डायलॉग प्रमाणे सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन करणे, ही अतिशय गंभीर बाब आहे. त्यामुळे शाळा,कॉलेज, ट्युशनच्या नावाखाली घराबाहेर जाणारी आपली मुलं बाहेर काय करतात? यावर पालकांनी काळजीपूर्वक लक्ष देणे फार गरजेचे आहे.
व्हीडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
https://youtu.be/LsZ3bBCm56g?si=H75G93V6eLi3xiJf