राजूर घाटात “या” प्रवाश्याने महिला कंडक्टर सोबत असं काय केलंय,,, चालकाने बस आणली थेट पोलीस ठाण्यात

More articles

राजूर घाटात “या” प्रवाश्याने महिला कंडक्टर सोबत असं काय केलंय,,, चालकाने बस आणली थेट पोलीस ठाण्यात

बुलडाणा – 19 मे

मलकापूर ते बुलडाणा बस मध्ये राजुरघाट एका महिला कंडक्टरला मद्यधुंद प्रवाश्याने अश्लील शिवीगाळ करत लोटपाट करून चक्क गळाच दाबून वाईट उद्देशाने तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना काल 18 मे रोजी सायंकाळी घडली.बस चालकाने बस थेट बुलडाणा शहर ठाण्यात आणून “त्या” प्रवाश्याला पोलिसांच्या स्वाधीन केले.सैन्यात कार्यरत या प्रवाश्याने शहर ठाण्यात देखील गोंधळ घालतला असता पोलिसांनी त्याला चांगलाच “चोप” दिल्याची चर्चा आहे.

याबाबत 38 वर्षीय महिला कंडक्टरने बोराखेडी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमुद केले आहे की, त्या काल मलकापूर वरून बुलडाणाकडे एमएच 06 एस 8046 बसवर ड्युटी करीत असतांना मोताळा येथून मद्यपान केलेला आरोपी संदीप ईश्वर पाटील रा. आवेजरखेडा, ता.भुसावळ जि.जळगाव, हा बस मध्ये चढला व आरडाओरडा करू लागला, त्याने महिला कंडक्टरला अश्लील शिवीगाळ केली, गळा दाबून लोटून दिल्याने त्या बसच्या सीटवर पडल्याने डोक्याला मुका मार लागला तसेच सर्व प्रवाश्या समोर वाईट उद्देशाने हात पकडून गळा पकडला त्यामुळे फिर्यादीचे वर्दीचे बटन उघडल्या गेले होते.बस मध्ये इतका राडा झाल्यानंतर चालकाने बस थेट बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात आणली होती. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत बोराखेडी पोलिसांना पाचारण करून बसमध्ये धिंगाणा घालणाऱ्याला त्यांच्या सुपूर्द केले.आरोपी संदीप ईश्वर पाटील विरुद्ध बोराखेडी पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा,विनयभंग व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

FM REDIO

spot_img

live Cricket Score

Latest

FM REDIO 2

मित्रा सोबत सहलीला जाने पडले महाग,स्कूल बसला कारने दिलेल्या धडकेत तरुण ठार,मोताळा-नांदुरा मार्गावरील घटना बुलडाणा - 23 डिसेंबर, मिरर न्युज नेटवर्क शैक्षणिक सहलीतून परतणाऱ्या विद्यार्थ्यांची उभी स्कूल बसला एका भरधाव वेगात...
spot_img
error: Content is protected !!