महाराष्ट्र कैडरचे 12 आयएएस अधिकारी अचानक का आले बुलडाण्यात???कुठे देणार भेट???जाणून घ्या या बातमीत
बुलडाणा – कासिम शेख, 18 मे
महाराष्ट्र कैडरचे 12 आयएएस अधिकारी दिनांक 18 मे रोजी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास बुलडाणा येथील शासकीय विश्रामगृह येथे दाखल झाले आहे.ते निवडणुकीच्या किंवा मतगणनेसाठी आले नसून हे प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी आहे.बुलढाणा जिल्ह्यातील शासकीय कामकाज तथा लोणार येथील जगप्रसिद्ध खाऱ्या पाण्याच्या सरोवराला ते भेट देऊन अभ्यास करणार आहे. बुलढाणा पोहोचल्यानंतर या सर्व अधिकाऱ्यांचा निवासी उपजिल्हाधिकारी निर्भय जैन, बुलडाणा प्रभारी तहसीलदार अमरसिंग पवार,सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता
रोहित सूर्यवंशी यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला.
यशदा पुणेचे सत्र संचालक अमोल बामिष्टे हे या अधिकाऱ्यासोबत समन्वयक म्हणून सोबत आलेले आहे. याबाबत माहिती देतांना अमोल बामिष्टे म्हणाले की भारतीय शासकीय सेवेतील 12 प्रशिक्षणार्थी सन 2023 बॅचचे अधिकारी यशदा पुणे येथे प्रशिक्षण घेत असून त्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात महाराष्ट्र दर्शन हा एक अभ्यासाचा भाग आहे. त्यानिमित्त ते बुलडाण्यात आले. येथील प्रशासकीय कामकाजा सोबतच लोणार येथे जाऊन सरोवराबाबत अभ्यास करणार आहे तसेच अधिकाऱ्यासोबत विकासात्मक बाबीवर चर्चा देखील करणार. भारतीय शासकीय सेवेत प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांचा 45 दिवस राज्यात पायाभूत प्रशिक्षण असतो त्यात 15 दिवस महाराष्ट्र दर्शन हा त्यांच्या अभ्यासाचा भाग असून त्यानिमित्त हे 12 प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी जिल्ह्यात आल्याची माहिती अमोल बामिष्टे यांनी दिली आहे. बुलडाणा जिल्ह्याचा अभ्यास झाल्यानंतर हे अधिकारी जळगाव जिल्ह्यात जाणार आहे.
दौऱ्यात या अधिकाऱ्यांचा आहे समावेश
1) सिद्धार्थ शुक्ला
2) लघीमा तिवारी
3) अनुष्का शर्मा
4) जी.व्ही.एस.पवनदत्त
5) कश्मिरा किशोर सांखे
6) बी सरावनन
7) अर्पिता अशोक ठुबे
8) अमर भीमराव राऊत
9) वेवोटूला केजो
10) डोंगरे रेविया
11) अरुण
12) पूजा मनोरमा दिलीप खेडकर