बुलडाण्यात अतिक्रमण काढण्यासाठी आलेल्या पथका समोर एकाने अंगावर डीजेल टाकून आत्मदहनाचा केला प्रयत्न,ठाण्यात गुन्ह्याची नोंद नाही
बुलडाणा –
बुलडाणा शहरातील सर्क्युलर रोडवर डीएड कॉलेजच्या प्रांगणा समोर शासकीय भूखंडावर अतिक्रमण करून आपली उपजीविका चालवणाऱ्या लोकांना अतिक्रमण हटविण्यासाठी बुलडा
णा नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी दोन-तीन वेळा जाऊन अतिक्रमण हटविन्याचे तोंडी सांगितले होते. अशात 15 में रोजी नगरपालिका प्रशासनाने कडक भूमिका घेत अतिक्रमण निर्मूलन पथकाला त्या ठिकाणी पाठविले होते.त्यानंतर काही अतिक्रमण धारकांनी आपला अतिक्रमण हटविण्यास सुरुवात केली.अशात दुपारी 4 वाजेच्या सुमारास मधुकर जोगदंड यांनी अतिक्रमण उठविण्यासाठी आलेल्या नगरपालिकेच्या पथकासमोर अचानक आपल्या अंगावर डिझेल टाकून घेतला व आपल्या दुकानात जाऊन दरवाजा बंद करून घेतला होता. त्यामुळे परिसरात एकाच गोंधळ उडाला होता. नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कसंतरी दरवाजा उघडून मधुकर जोगदंड यांना बाहेर काढले. घटनास्थळी पोलिसांना देखील बोलावण्यात आले होते. याप्रकरणी बुलडाणा नगरपालिकेकडून कोणतीच तक्रार ना दिल्यामुळे शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नाही,अशी माहिती ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांनी दिली आहे.