दैवबलवत्तर म्हणून “समृद्धी” सारखी दुर्घटना टळली, बुलडाणा जिल्ह्यातील भाविकांची लक्झरी बस मध्यप्रदेश येथील शिवपुरी जवळ जळाली,सर्व भाविक सुखरूप

More articles

दैवबलवत्तर म्हणून “समृद्धी” सारखी दुर्घटना टळली, बुलडाणा जिल्ह्यातील भाविकांची लक्झरी बस मध्यप्रदेश येथील शिवपुरी जवळ जळाली,सर्व भाविक सुखरूप

शिवपुरी/बुलडाणा – 17 मे

बुलडाणा शहरासह धामणगाव बढे येथून चारधाम यात्रेसाठी निघालेल्या भाविकांच्या दोन लक्झरी बस पैकी एका बसला मध्यप्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातील कोलारस नजीक आज 17 मेच्या दुपारी 2 वाजेच्या सुमारास अचानक आग लागून संपूर्ण बस जळून खाक झाली.दरम्यान समय सुचकता राखत सर्व भाविक बसमधून बाहेर पडल्याने सुखरूप बचावले. त्यामुळे ‘समृद्धी’वरील गतवर्षीच्या अपघाताची मध्यप्रदेशमध्ये होणारी पुनर्रावृत्ती टळली.


प्राप्त माहितीनुसार बुलडाणा जिल्ह्यातून दोन लक्जरी बसद्वारे 60 भाविक केदारनाथ यात्रेसाठी 15 मे रोजी निघाले होते. एका बसमध्ये धामणगाव बढे येथील तर आग लागलेल्या बसमध्ये बुलडाणा येथील भाविक होते. मध्यप्रदेशातील शिवपुरी ते गुणा या फोरलेन महामार्गावरील कोलारस पोलिस ठाण्याच्या हद्दीत बैरसिया क्रॉसिंगनजीक बसमधून धुर निघत असल्याचे निदर्शनास आल्याने चालकाने बस थांबवली व सर्व भाविकांना सुखरूप खाली उतरले. बसमधील सर्वच्या सर्व 30 भाविक सुखरुपपणे उतरण्यात यशस्वी झाल्याचे भाविकांपैकी एकाचे नातेवाईक असलेल्या उल्लास बढे पाटील यांनी सांगितले. या बसमध्ये 18 महिला व 12 पुरुषांचा समावेश होता. दरम्यान बसने चांगलीच आग पकडली होती.कोलारस पालिकेच्या अग्निश्यामक दलाने नंतर ही आग विझवली.परंतू बस पुर्णत: जळून खाक झाली आहे. बसच्या एसीमध्ये शॉर्टसर्कीट होऊन ही आग लागल्याची चर्चा यात्रेकरूपैकी एकाने बोलून दाखवली आहे.

FM REDIO

spot_img

live Cricket Score

Latest

FM REDIO 2

मित्रा सोबत सहलीला जाने पडले महाग,स्कूल बसला कारने दिलेल्या धडकेत तरुण ठार,मोताळा-नांदुरा मार्गावरील घटना बुलडाणा - 23 डिसेंबर, मिरर न्युज नेटवर्क शैक्षणिक सहलीतून परतणाऱ्या विद्यार्थ्यांची उभी स्कूल बसला एका भरधाव वेगात...
spot_img
error: Content is protected !!