“सिस्टर”वर केला “ब्रदर”ने बलात्कार,बदनामी व मुलांना जीवे मारण्याची दिली होती धमकी,आरोपी विरुध्द बुलडाणा शहर ठाण्यात बलात्कार व ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
बुलडाणा – 16 मे
या बाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बुलडाणा शहरातील रहिवासी असलेली 32 वर्षीय महिला शहरातील एका खासगी दवाखान्यात परिचारीका म्हणुन कामाला होती. याच दवाखान्यात आरोपी विशाल गजानन बोराडे वय 23 हा सुध्दा ब्रदर म्हणून कामाला होता. दोघेही एकाच दवाखान्यात कामाला असल्यामुळे त्यांची एकमेकाची ओळख झाली. त्यानंतर त्यांचे एकमेकांच्या घरी येणे जाणे सुरू झाले. दरम्यान 1 जून 2021 ते 29 फेब्रुवारी 2024 या दरम्यान आरोपी विशाल बोराडे याने महिलेला बदनामी करण्याची व मुलांना जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्या इच्छे विरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले.या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरुन शहर पोलीसांनी उपरोक्त आरोपी विरुध्द 13 मेला रात्री 9 वाजेच्या सुमारास बलात्कार व ॲट्रॉसिटी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील हे करीत आहेत.