कोणी दिली धडक पत्ताच नाही,, दुचाकी चालक तरुणाने गमावला आपला जीव,बुलडाणा ते चिखली मार्गावरील घटना
बुलडाणा – 11 मे
केळवदहुन बुलडाणाकडे जाणारी दुजाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली असून यात दुचाकी चालकाचा मृत्यू झाला आहे. ही घटना काल 10 मेला रात्री 7 वाजेच्या सुमारास घडली आहे.
याबाबत प्राप्त माहिती अशी की केळवद येथील रहिवासी पवन गजानन खिल्लारे वय 17 वर्ष हा काल काही कामानिमित्त आपल्या दुचाकीने बुलडाणाकडे जात असताना अंत्री तेली फाट्याजवळ अज्ञात वाहनाने पवनच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याचा कयास व्यक्त करण्यात येत आहे.यात तो बेशुद्ध झाला होता.काही लोकांनी तात्काळ मदत करत पवनला बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.आज 11 मेला सकाळी 10 वाजता जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.