बुलडाण्यात चंदनचोर “पुष्पा” बेलगाम, मा. न्यायाधीशांच्या बंगल्यातून चंदनचा झाड कापून चोरून नेले,अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल
बुलडाणा – 6 मे
बुलडाणा शहरात मोठमोठे अधिकारी तर सोडा आता न्यायाधीशांचे निवासी स्थान सुद्धा सुरक्षित नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. चंदनचोर पुष्पांची इतकी हिंमत वाढलेली आहे की त्यांनी विष्णुवाडी येथील न्यायाधीशांच्या बंगल्याच्या आवारातील एका चंदनचा झाड कापून चोरून नेला आहे. ही बाब 5 मेला सकाळी 6 वाजता समोर आली. याप्रकरणी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात आज 6 मेला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत शिपाई अमोल दत्तू काळवाघे वय 35 वर्ष यांनी बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की,ते 5 मेला सकाळी मा.न्यायाधीश ए.एम.मगरे यांच्या निवासस्थानी ड्युटीसाठी गेले.साफसफाई करत असतांना बंगल्याच्या वॉलकंपाऊंड मध्ये एक चंदनाचा झाड तुटलेला दिसून आला.या झाडाला अज्ञात चोरट्याने कटरच्या सहायाने कापून त्याचे खोड चोरून घेऊन गेला.याची माहिती त्यांनी मा. न्यायाधीश साहेबांना दिली. अशा तक्रारीवर अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बुलढाण्यात चंदन चोर “पुष्पां”ची मजा
बुलडाणा शहर हे अजिंठा पर्वत रांगेवर वसलेले शहर असून या शहराला इंग्रजांनी विकसित केले.त्यांनी मौल्यवान झाडे लावली. आजही चंदन,सागवनची झाडे आपल्याला पाहायला मिळतात. याच मौल्यवान चंदनाच्या झाडांना बुलडाणा येथील “पुष्पा” टारगेट करत आहे.जिल्हाधिकारी,जिल्हा पोलीस अधीक्षक, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता,तहसीलदार यांच्यासह इतर अनेक अधिकाऱ्यांच्या बंगल्यातून
चंदनाची झाडे कापून नेण्यात आली आहे. याबाबत पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे देखील दाखल असून पोलिसांना काही गुन्ह्याच्या तपासात चंदन चोरा पर्यंत पोहोचण्यात अपयश आलेले आहे. यामुळे असेच म्हणावे लागेल की बुलडाण्यात चंदन चोर “पुष्पां”ची मजा आहे.