“ड्रीम-11” ने केलं करोडपती होण्याचं “ड्रीम” पूर्ण,,, बुलडाणा जिल्ह्यातील “या” शहराच्या तरुणाने जिंकले दीड करोड
चिखली – 6 मे
इंडियन प्रीमियम लीग सुरू आहे. आयपीएलच्या प्रत्येक सामन्यावर मोठ्या प्रमाणात सट्टा खेळाला जात आहे. काल 5 मे रोजी बुलडाणा जिल्ह्यातील चिखली शहरात राहणाऱ्या एका तरुणाचा कालच्या सामन्याने भाग्य बदलून दिले आहे.ड्रीम-11 मध्ये या तरुणाला दीड करोड रुपये जिंकता आले.ड्रीम-11″ च्या माध्यमाने करोडपती होण्याचं आपला “ड्रीम” पूर्ण करणाऱ्या या तरुणाचे नांव सादिक शेख असे आहे.
चिखली शहरातील लक्ष्मी मार्केट मध्ये स्टार मोबाईल शॉप चालवणाऱ्या सादिक शेख याने “sadik devil’s 324877” या आयडी वरून काल रात्री 7:30 वाजता “ड्रीम-11” मध्ये आपले अकरा खेळाडू घेऊन टीम सिलेक्ट केली व अवघ्या 4 तासात दीड करोड रूपये जिंकले.सादिक शेख यांची कल्पक बुध्दी,समयसूचकता व नशीबाने साथ दिल्याने त्यांना दीड करोड रूपये जिंकता आले. केवळ 49 रूपये गुंतवणूक आणि करोडपती ही स्वप्न आजच्या पिढीतील लाखो करोडो तरूण पाहतात परंतू प्रत्येकाला हे साध्य होत नाही.यामध्ये एक रुपया विजेता कमावत असेल तर करोडो रूपये कंपनी कमावते त्यामुळे तरुणांनी सावधानता बाळगावी, सादिक सारखा नशीब सर्वांचं नसेल.
सलग 28 तास चालला अस्वलाचा थरारक रेस्क्यू,,, विहिरीत पडलेल्या अस्वलाला वन विभागाने दिले जीवदान,, मोताळा तालुक्यातील तारापूर येथील घटना
बुलडाणा - 9 जानेवारी, मिरर न्युज नेटवर्क
भौगोल वातावरण पौष्टिक असल्याने बुलडाणा...