“मला आत जाऊ द्या” दारुड्याचा स्ट्रॉंग रूमच्या मेन गेट समोर धिंगाणा,,पोलिसांनी केली “ही” कारवाई
बुलडाणा – 4 मे
मागील 26 एप्रिलला दुसऱ्या टप्प्यात बुलडाणा लोकसभेची निवडणूक पार पडली.मतदानानंतर सर्व ईव्हीएम मशीन बुलडाणा येथील मलकापूर मार्गावरील आयटीआय कॉलेजमध्ये ठेवण्यात आले आहे.या स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षेसाठी आयटीआयच्या संपूर्ण परिसरात चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
दिनांक 2 मेला दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास आरोपी अमोल श्रीराम नाईक वय 42 वर्षे रा.वरुड ता.मेहकर हा आयटीआय कॉलेजच्या गेट समोर दारू पिऊन आला तो पोलिसांना म्हणाला की मला नातेवाईकाला भेटायला आत जाऊ द्या,त्याला पोलिसांनी मनाई केली असता आरोपीने सार्वजनिक रोडवर आरडाओरड करून शांतता भंग केली,म्हणून पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची वैद्यकीय तपासणी केली असता आरोपी हा दारू पिलेला होता.आरोपीवर दारूबंदी कायद्याप्रमाणे बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी सुशील महादेव धांडे नेमणूक जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखा यांच्या तक्रारीवर त्याच दिवशी दुपारी 4 वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.