एसटी बसला लक्झरी बसने मागून दिली धडक,एक महिला ठार,25 प्रवासी जखमी,मेहकर जवळ घडला अपघात
बुलडाणा – 4 मे
बुलडाण्याहून निघालेल्या या बस मध्ये जवळपास 44 प्रवासी बसलेले होते मेहकर जवळील चांगळी पुलाजवळ एसटी बसला मागून ओव्हरटेक करण्याच्या नादात लक्झरी बसने जोरदार धडक दिली.ही लक्झरी सुरत होऊन मेहकरला जात होती. या अपघातात एसटी बस मधील एक महिला प्रवासी जागी ठार झाली तर जखमींना मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच मेकर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींची मदत केली.