नवऱ्याला आली लहर,,त्याने केलं कहर, टूनकीत एका नवऱ्यासोबत नेमकं घडलंय काय????
बातमी बघूनच कळणार
बुलडाणा – 28 एप्रिल
बुलडाणा जिल्ह्यातील टुनकी येथे काल 27 एप्रिलच्या रात्री 8:30 वाजेच्या सुमारास एका लग्नाची वरात निघाली होती.डीजेच्या तालावर वराती मंडळी ठेके धरत असताना नवऱ्याने चक्क म्यान मधून तलवार काढून हातात फिरवली त्यामुळे काही काळ दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.या प्रकरणी आरोपी नवरदेव सचिन सुरेश कोष्टी रा.टूनकी याच्या विरुद्ध आज राविवारला सकाळी 11 वाजता सोनाळा पोलीस ठाण्यात आर्म ऍक्ट कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलीस कर्मचारी विनोद शिवाजी शिंबरे यांनी सोनाळा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की काल रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास टुणकी येथील बस स्टॅन्ड वर आरोपी सचिन सुरेश कोष्टी याच्या नानमुखाचा कार्यक्रम कार्यक्रमांमध्ये डीजे लावण्यात आला होता त्या डीजेचे तालावर सार्वजनिक ठिकाणी त्याने तलवार ज्ञान मधून काढून नंगि तलवार हवेत फिरवली त्यामुळे माननीय जिल्हाधिकारी बुलढाणा यांचे आदेशाचे उल्लंघन करताना तो आढळून आला आहे त्यामुळे आरोपी नवरदेव विरुद्ध विविध कलमान्वये पुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.