बुलडाणा जिल्ह्यातील “या” गावात तरुणांच्या दोन गटात दंगल, लाठ्याकाठ्याने केली मारहाण, 2 जण जखमी, पोलिसांनी 18 आरोपींना केली अटक
बुलडाणा – 27 एप्रिल
बुलडाणा तालुक्यातील रायपूर पोलीस ठाणे हद्दीतील ग्राम सातगाव भुसारी येथे काल 26 एप्रिलच्या रात्री 9:30 वाजेच्या सुमारास तरुणांच्या दोन गटात किरकोळ वादावरून लाठ्या-काठ्याने मारहाण होऊन दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होत. यात 2 तरुण जखमी झाले आहे. रायपुर ठाणेदार दुर्गेश राजपूत यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली व बुलढाणा, चिखली आणि धाड येथून अतिरिक्त पोलीस कुमक बोलावून परिस्थिती नियंत्रणात आणली. रात्री दोन्ही गटातील 18 आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी आज 27 एप्रिलला दुपारी दिली आहे.
याबाबत प्राप्त माहिती अशी की सातगांव भुसारी येथील दोन गटात मागील काही दिवसापासून कुणकुण सुरू होती. अशात काल रात्री दोन्ही गट आमोरासमोर आले व एकमेकांना जबर मारहाण केली. त्यामुळे गावातील शांतता बाधित होऊन दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. याप्रकरणी रायपूर पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी अनंता कळमकर यांच्या तक्रारीवर दोन्ही गटातील दंगलखोरावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने अप्पर पोलीस अधीक्षक बीबी महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली रात्रीच पोलिसांनी आरोपींचा शोध घेत 18 आरोपींना अटक केली आहे. गावात शांतता व सुव्यवस्था कायम राहण्यासाठी बुलढाणा येथून दंगा काबू पथक, तसेच चिखली,धाड पोलिसांना प्राचारण करण्यात आले होते. उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांनीही गावात भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. रात्री अटक करण्यात आलेल्या सर्व 18 आरोपींना आज शनिवारी चिखली कोर्टात हजर केले असता त्यांचा जामीन मंजूर करण्यात आला आहे.
ठाणेदार दुर्गेश राजपूत यांनी दिला इशारा,,,
यापुढे रायपूर पोलीस स्टेशन हद्दीत कुठल्याही गावात कोणत्याही व्यक्तीने कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्यास तसेच सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न केल्यास त्याची पोलीस स्वतः दखल घेऊन अशाच प्रकारची कठोर कारवाई करतील,असा इशारा रायपुर ठाणेदार दुर्गेश राजपूत यांनी दिला आहे.
या आरोपींना करण्यात आली होती अटक,,,
1 – विशाल रमेश गाडे
2 – अमोल दत्तात्रय भुसारी
3 – युवराज संजय काळे
4 – ऋषिकेश अनिल भुसारी
5 – अंकलेश गजानन भुसारी
6 – सागर राजेन्द्र भुसारी
7 – पंकज दिलीप भुसारी
8 – विशाल गजानन ढगे
9 – ऋषिकेश संजय सोनाळकर
10 – रविन्द्र गणेश वाघ
11 – स्वप्नील संजय मोरे
12 – संजय सुगदेव मोरे
13 – राहुल राजु मोरे
14 – सुरज अरुण जाधव 15 – सागर वसंता जाधव 16 – गणेश सुरेश जाधव
17 – राहुल प्रकाश इंगळे
18- प्रविण सखाराम हिवाळे
सर्व रा.सातगाव भुसारी