निराशाजनक,,,मतदारांनी फिरवली पाठ,,बुलडाणा लोकसभा मतदारसंघात 57.27 टक्के मतदान
बुलडाणा – 26 एप्रिल
सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आज बुलढाणा लोकसभा मतदार संघाची निवडणूक शांततेत पार पडली. सकाळी सात वाजता प्रत्यक्षात मतदान प्रक्रियेला सुरुवात होऊन सायंकाळी सहा वाजता मतदान प्रक्रिया पूर्ण झाली.57.27 टक्के मतदान झाल्याची माहिती Voter Turnout या भारतीय निवडणूक आयोगाच्या एपवर अपलोड करण्यात आली आहे.
2019 मध्ये बुलडाणा लोकसभा मतदारसंघात 63% मतदान झाला होता.यंदा मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील जातीने लक्ष देत होते. त्यांनी लोकसभा निवडणुकीत 70 टक्के पेक्षा जास्त मतदान व्हावे असे लक्ष ठेवले होते परंतु आज झालेल्या मतदानानंतर जे आकडेवारी हाती आली आहे ती निराशादायक आहे. लोकसभा मतदार संघातील 6 विधानसभा मतदारसंघ निहाय मतदानाची टक्केवारी खालील प्रमाणे आहे,,
👉🏻बुलडाणा – 46.56 %
👉🏻चिखली – 60.79 %
👉🏻जळगांव जा.- 49.55%
👉🏻खामगाव – 64.36%
👉🏻मेहकर -61.14%
👉🏻सिंदखेडराजा -61.00%
सर्वात कमी मतदान बुलडाणा विधानसभा मतदार संघात झाला, तर सर्वात जास्त मतदानाची नोंद खामगाव मतदार संघाची आहे. आता या कमी मतदानाचा कोणाला फटका बसणार तर कोणाला फायदा होणार हे तर येत्या 4 जूनला कळेल.