देऊळघाट येथील ईव्हीएम मशीन मध्ये काय झालं घोळ???अधिकाऱ्याने उचलला हा पाऊल

More articles

देऊळघाट येथील ईव्हीएम मशीन मध्ये काय झालं घोळ???अधिकाऱ्याने उचलला हा पाऊल

45 मिनिटं मतदान थांबले

शेवटी मशीन बदलावे लागले

बुलडाणा – 26 एप्रिल

दुसऱ्या टप्प्यात आज बुलडाणा लोकसभेसाठी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडत आहे. मात्र जिल्ह्यातील मोजक्या मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन मध्ये तांत्रिक बिघाड आल्याची माहिती कानावर आली आहे अशीच घटना देऊळघाट येथे देखील घडली त्यामुळे जवळपास 45 मिनिट मतदारांना थांबवावे लागले.
बुलडाणा तालुक्यातील देऊळघाट हे एक मोठे गाव आहे. या ठिकाणी एकूण 13 मतदान केंद्र असून 12 हजार 295 इतके मतदाता आहे.देऊळघाट येथील जिल्हा परिषद उर्दू कन्या शाळा येथील मतदान केंद्र क्रमांक 277 मधील ईव्हीएम मशीन मध्ये दुपारी 12 वाजता तांत्रिक बिघाड आल्याने जवळपास 45 मिनिटं या केंद्रावरील मतदान प्रक्रिया ठप्प झाली होती.बूथ अधिकारीने याची माहिती झोनल ऑफिसर महावीर मिरकुटे यांना दिली असता ते तात्काळ त्यांच्याकडे असलेली अतिरिक्त मशीन घेऊन मतदान केंद्रावर पोहोचले व तांत्रिक बिघाड आलेली मशीन बदलण्यात आली. बिघाड आलेल्या मशीनमध्ये 326 लोकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता.पाऊण वाजता मशीन बदलून मॉकपोल घेण्यात आला.सद्या मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू असल्याची माहिती झोनल अधिकारी महावीर निरकुटे यांनी दिली.

FM REDIO

spot_img

live Cricket Score

Latest

FM REDIO 2

मित्रा सोबत सहलीला जाने पडले महाग,स्कूल बसला कारने दिलेल्या धडकेत तरुण ठार,मोताळा-नांदुरा मार्गावरील घटना बुलडाणा - 23 डिसेंबर, मिरर न्युज नेटवर्क शैक्षणिक सहलीतून परतणाऱ्या विद्यार्थ्यांची उभी स्कूल बसला एका भरधाव वेगात...
spot_img
error: Content is protected !!