मुस्लिम बांधवांची ही साथ आयुष्यभर विसरणार नाही!प्रा.नरेंद्र खेडेकर
बुलडाणा – 19 एप्रिल
बुलडाणा लोकसभेसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार प्रा.नरेंद्र खेडेकर यांच्या प्रचारासाठी बुलडाणा शहरातील इक्बाल चौक येथे 18 एप्रिलला समस्त मुस्लिम बांधवांनी बैठकीचे आयोजन केले होते.यावेळी समाज बांधवांनी त्यांना आपलं पाठिंबा दर्शवला आहे. माझ्या प्रती दाखविलेल्या विश्वासाला कधीही तडा जावू देणार नाही.सामाजिक ऐक्याचा मुस्लिम बांधवांनी संदेश देत सत्याच्या आणि निष्ठेची साथ देण्याचा निर्णय घेतला आहे.मुस्लिम बांधवांची ही साथ आयुष्यभर विसरणार नाही,असे वचन प्रा.खेडेकर यांनी आपल्या भाषणात दिले आहे.
या प्रसंगी, संजय राठोड, जयश्री शेळके,नरेश शेळके,सुनील सपकाळ, जाकीर कुरेशी,अमीन टेलर,तारिक नदीम, सत्तार कुरेशी, अफजल शेख, साबिर कुरेशी, युनूस कुरेशी, गुड्डू मिर्झा, अश्फाक बागबान, अनिस बागबान, हाजी सलीम, इजहार देशमुख, मोईन काजी, सय्यद आसिफ, जावेद खान, मुख्तार शाह, बाबा चौधरी, शेख परवेज यांच्यासह मोठ्या संख्ये मुस्लिम बांधव व महविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.