नरेंद्र मोदींच्या वर्धा येथील सभेच्या बंदोबस्तासाठी जाणाऱ्या पोलिसाने रेल्वे समोर झोपून केली आत्महत्या
शेगांव – 18 एप्रिल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर्धा येथील प्रचार सभेच्या बंदोबस्तासाठी जाणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याने आज गुरुवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव जवळ मुंबई- नागपूर या लोहमार्गावरून धावणाऱ्या ओखा-पुरी एक्स्प्रेस समोर झोपून आत्महत्या केली.या घटनेने बुलढाणा जिल्हा पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे.
किसन गायकवाड असे आत्महत्या करणाऱ्या एएसआयचे नाव असून ते बुलढाणा जिल्ह्यातील अमडापूर पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत होते.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उद्या शुक्रवारी विदर्भातील वर्धा येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे.या सभेसाठी बुलढाणा जिल्ह्यातून पोलीस बंदोबस्त रवाना करण्यात आलेला आहे. यामध्ये अमडापूर पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेले एएसआय किसन गायकवाड हे सुद्धा आज रवाना झाले होते.दरम्यान आज दुपारी त्यांनी शेगाव शहरातील अकोट रोडवर असलेल्या रेल्वे गेट जवळ मुंबई – नागपूर या डाऊन रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या ओखा-पुरी एक्स्प्रेस समोर झोपून आपले जीवन संपवले.या संदर्भात ओखा पुरी एक्स्प्रेसच्या लोको पायलट पी.एन. देशमुख यांनी व्हीएचएफ द्वारे शेगाव रेल्वे स्टेशन मॅनेजरला कळविले कि,अज्ञात व्यक्तीने शेगाव ते नागझरी दरम्यानच्या 547/23 कि.मी येथे ट्रेन क्रमाक 20820 समोर आत्महत्या केली आहे.एएसआय किसन गायकवाड यांनी आत्मत्या का केली??याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.