प्रचाराचा ताफा थांबवत अपघात ग्रस्थाच्या मदतीला धावले महाविकास आघाडीचे उमेदवार प्रा.नरेंद्र खेडेकर
बुलडाणा – 13 एप्रिल
बाळासाहेबांनी दिलेली खरी जनसेवेची शिकवण म्हणजे 80 टक्के समाजकारण 20 टक्के राजकारण. हा विचार बुलडाण्यात फक्त नरेंद्र खेडेकर या माणसात दिसून येतो. आज प्रचार दौऱ्यात व्यस्त असताना देखील केवळ माणुसकी म्हणून मेहकर तालुक्यातील उकळी-सुकळी गावाच्या दिशेने प्रवास करत असताना महामार्गावर एका दुचाकी चालकाचा गंभीर अपघात झाला असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले त्यांनी तात्काळ आपला ताफा थांबवला आणि पाहिले अपघात ग्रस्थाला स्वताच्या गाडीत घेऊन ते हॉस्पिटलला पोहचले.
अपघातग्रस्त व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता.क्षणाचाही विचार न करता त्याला महाविकास आघाडीचे बुलडाणा लोकसभेचे उमेदवार प्रा.नरेंद्र खेडेकर यांनी स्वतःच्या गाडीत टाकून हॉस्पिटल मध्ये दाखल केले व संबंधित डॉक्टरांना सविस्तर माहिती दिली.त्याच्या उपचाराची सर्व व्यवस्था करून तो शुध्दीवर आल्यानंतर त्यांनी पुढचा प्रवास केला.हाच विचार बाळासाहेबांनी प्रत्येक शिवसैनिकाला दिला आहे.