मोताळा तालुक्यात विज पडून बिहार येथील पोकलेन ऑपरेटरचा मृत्यू तर 1 जण जखमी,लाखनवाडा येथे बैल ठार
बुलडाणा – 12 एप्रिल
मागील 3 दिवसापासून बुलडाणा जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस व गारपीट सुरू आहे.आज दि. 12 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा, खामगाव आणि मेहकर या तालुक्यात विजांच्या कडकडासह अवकाळी पाऊस पडला.मोताळा तालुक्यातील मौजे खरबडी शिवारात अजय शंकर दळवी यांचे मालकीचे पोकलेनवर ऑपरेटर संजीव उमेश मंडळ वय 20 वर्ष या बिहार राज्यातील 20 वर्षीय तरुणावर विज पडून मृत्यू झाला तर सुनील वामन दळवी जखमी झाला असून त्याला उपचारासाठी बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालय रुग्णालय येथे भरती करण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे खामगाव तालुक्यातील लाखनवाडा येथील शेतकरी गजानन वाघ यांच्या बैलावर वीज पडल्याने मृत्यू झाला आहे.