देऊळघाट येथे आगामी लोकसभा निवडणूक व सण-उत्सव निमित्त पोलिसांचा रूटमार्च
बुलडाणा – 7 एप्रिल
बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील देऊळघाट येथे आज 7 एप्रिलला सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास मोठ्या फोज फाट्यासह पोलिसांनी गावात रूट मार्च काढला आहे. आगामी लोकसभा निवडणूक तसेच सण उत्सव शांततेत पार पाडावे यासाठी देऊळघाट येथे हे रूट मार्च बस स्टॅन्ड येथून सुरू झालं व क्रांती चौक, गजानन महाराज मंदिर, पाटीलपुरा, देशमुख पुरा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, इकबाल चौक, उमाळावेस, जामा मस्जिद, तेलीपुरा, रिठा मस्जिद, क्रांती चौक व स्टॅन्ड असा रूट मार्च काढण्यात आला होता.या रूटमारच मध्ये सीआयएसएफचे 03 अधिकारी व 66 जवान, पोलीस स्टेशन बुलढाणा ग्रामीण येथील एक अधिकारी 16 अमलदार हजर होते.