मतदानासाठी 12 प्रकारचे ओळखपत्र ग्राह्य

More articles

बुलडाणा – 2 एप्रिल लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान करताना मतदान ओळखपत्र आवश्यक आहे. मतदार ओळख पत्राव्यतिरिक्त मतदारांना ओळख पटविण्यासाठी 12 प्रकारचे ओळखपत्र ग्राह्य मानण्यात येणार आहे.
मतदारांना छायाचित्रासह मतदार ओळखपत्र देण्यात येते. ते मतदार मतदान केंद्रावर त्यांची ओळख पटविण्यासाठी छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करतील. मतदार छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करु शकत नसल्यास अशा मतदारांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त नमूद कागपत्रे पुरावा म्हणून सादर करु शकतील, असे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहे. या 12 पुराव्यांमध्ये आधार कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, बॅक, पोस्ट ऑफिसने जारी केलेल्या छायाचित्रासह पासबुक, कामगार मंत्रालयाच्या योजननेंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहन चालक परवाना, पॅन कार्ड, रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया यांचेद्वारे नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर अंतर्गत निर्गमित स्मार्ट कार्ड, भारतीय पासपोर्ट, फोटोसह पेन्शन दस्तऐवज, केंद्र, राज्य सरकार, सार्वजनिक उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपनी यांनी कर्मचाऱ्यांना जारी केलेले सेवा ओळखपत्र, खासदार, आमदारांना जारी करण्यात आलेले अधिकृत ओळखपत्र, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाने जारी केलेले विशेष विकालांगता प्रमाणपत्र ग्राह्या मानण्यात येणार आहे.

FM REDIO

spot_img

live Cricket Score

Latest

FM REDIO 2

"त्या" मतिमंद व्यक्तीवर खरंच अस्वलाचा हल्ला?? बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल,पळसखेड सपकाळ शिवारातील घटना बुलडाणा - 22 डिसेंबर, मिरर न्युज नेटवर्क शेतातून परत येणाऱ्या एका 36 वर्षीय मतिमंद व्यक्तीवर अचानकपणे...
spot_img
error: Content is protected !!