बुलडाणा – 31 मार्च बुलडाणा तालुक्यातील पिंपळगाव सराई गावाजवळ हाजी हजरत अब्दुल रहमान उर्फ सैलानी बाबा यांची दर्गा आहे. दरवर्षी लाखो भाविक या ठिकाणी हजेरी लावतात. होळी दहनाने या यात्रेला आरंभ होत असते.यावर्षी देखील होळीदहन नंतर यात्रेला आरंभ झालेला आहे.होळीच्या पाचव्या दिवशी परंपरेनुसार पिंपळगाव सराई येथील मुजावर परिवारांच्या घरातून सैलानी बाबांचा संदल एका उटणीवरून दर्गा पर्यंत काढण्यात येत असते. 30 मार्चला रात्री 9 वाजता हा संदल पिंपळगाव सराई येथून काढण्यात आला आणि जवळपास 4 किलोमीटर पायी चालत संदल दरगाहवर पोहोचला. यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूला भाविक रांगेत उभे राहून संदलचे दर्शन घेत होते.रात्री 12:15 वाजेच्या सुमारास संदल दरगाहवर पोहोचला व मुजावर परिवारातील प्रमुख शे.रफिक मुजावर,हाजी शे. हाशम मुजावर,शे.शफीक मुजावर,शे.कदिर मुजावर, पं.स.माजी सदस्य शे.चांद मुजावर,शे.रशीद मुजावर, शे.जाहीर मुजावर, शे.गुलाब मुजावर, शे. महेबूब मुजावर, शे.नईम मुजावर, शे.असलम मुजावर,शे.राजा मुजावर,शे आदिल मुजावर, शे.जावेद मुजावर व मुजावर परिवारातील इतर सदस्यांच्या उपस्थितीत मजार-ए-शरीफवर विधिवत संदल चढविण्यात आला.या वेळी दरगाह परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता व एडिशनल एसपी बी.बी.महामुनी आणि रायपूर ठाणेदार दुर्गेश राजपूत लक्ष ठेऊन होते.