बुलडाणा – 29 मार्चबुलडाणा तालुक्यातील पिंपळगाव सराई गावाजवळ हाजी हजरत अब्दुल रहमान उर्फ सैलानी बाबा यांची दर्गा आहे. दरवर्षी लाखो भाविक या ठिकाणी हजेरी लावतात. होळी दहनाने या यात्रेला आरंभ होत असते.यावर्षी देखील होळीदहन नंतर यात्रेला आरंभ झालेला आहे.होळीच्या पाचव्या दिवशी परंपरेनुसार पिंपळगाव सराई येथील मुजावर परिवारांच्या घरातून सैलानी बाबांचा संदल एका उटणीवरून दर्गा पर्यंत काढण्यात येत असते. 30 मार्चला रात्री 8 वाजता हा संदल पिंपळगाव सराई येथून काढण्यात येणार असल्याची माहिती पंचायत समितीचे माजी सदस्य शेख चांद मुजावर यांनी आज 29 मार्चला दिली आहे.