बुलडाणा – 2 एप्रिल बुलढाणा शहरातील क्रीडा संकुल रोडवर राहणारे फर्यादी विठ्ठल आनंदा खोंडे वय 55 वर्ष यांचे येळगांव शिवारात शेत असून दिनांक 30 मार्चला सकाळी 10 वाजेच्या दरम्यान ते शेतामध्ये चक्कर मारण्यासाठी गेले असता शेताला लावलेले लोखंडी अँगल दिसुन आले नाही. शेताला केलेले तार कंपाउण्डचे 5 फुटाचे 15 लोखंडी अँगल किमंती अंदाजे 10 हजार रुपये कोणीतरी अज्ञात चोरट्याने कापुन चोरुन नेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.सदर एंगल कोणी अज्ञात चोरटयाने कापून चोरुन नेल्याची तक्रार त्यांनी बुलढाणा शहर पोलिस ठाण्यात 1 एप्रिलच्या रात्री 9:30 वाजता दिल्याने चोरिचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे

